पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. हवामान खात्याने कळवले आहे की, सध्या मान्सून काही दिवस थांबलेला आहे.
१ ऑक्टोबरपासून वातावरण पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही भागात पावसाचे प्रमाण वाढू शकते. विशेषतः मराठवाडा व कोकण किनारपट्टीवर हलकासा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आणखी काही दिवस उन्हाचे वातावरण
सध्या राज्यात अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका जाणवत आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पुणे या भागात ऊन तीव्र असून, याचा परिणाम शेती व दैनंदिन जीवनावर जाणवतो आहे.
पुन्हा पावसाची शक्यता
हवामान विभागानुसार, १ ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा पावसाचे सत्र सुरू होईल. या काळात मराठवाडा, विदर्भ, मुंबई, कोकण व घाटमाथा या भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे.

